प्रसिद्ध गजल गायक भूपिंदर सिंह यांचे निधन झाले आहे. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. भूपिंदर सिंह हे प्रसिद्ध संगीतकार आणि प्रामुख्याने गझल गायक होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन देखील केले आहे.
भूपिंदर सिंह यांनी गुलजार यांनी लिहिलेल्या अशा अनेक गजलांना आवाज दिला आहे, जे लोक आजही ऐकतात. त्यांनी किसी 'नजर को तेरा इंतजार आज भी है', 'हवा गुजर गयी पत्ते थे कुछ हिले भी नहीं', 'कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता' आणि 'राहों पे नजर रखना' अशा अनेक गजलांना आपला आवाज दिल आहे. त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार आरडी बर्मन यांच्यासोबत भूपिंदर सिंह यांच्या कामालाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 'दिल ढुंढता है फिर वही फुर्सत के रात-दिन..' असो किंवा 'घरौंदा' चित्रपटातील 'दो दीवाने शहर में..'हे गाणे असो, भूपिंदर यांनी आपल्या आवाजाने ही गाणी आणखी सुंदर आणि संस्मरणीय बनवली.सिंह यांना “मौसम”,“सत्ते पे सत्ता”,“आहिस्ता आहिस्ता”,“दूरियां”,“हकीकत”आणि इतर बर्याच चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय गाण्यांसाठी लक्षात ठेवले जाते.
भूपेंद्र सिंह यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग हे देखील उत्तम संगीतकार होते.त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात भूपेंद्र ऑल इंडिया रेडिओवर त्यांच्या ऑफर्स देत असत. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलजार यांनी लिहिलेल्या 'वो जो शहर था' या गाण्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली, असे म्हटले जाते. भूपेंद्र यांनी 1980 मध्ये बंगाली गायिका मिताली मुखर्जीसोबत लग्न केले. या जोडप्याला मूलबाळ नाही. गायकावर रात्री जवळच्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.