Publish Date: Mon, 21 Oct 2024 (20:58 IST)
Updated Date: Mon, 21 Oct 2024 (21:01 IST)
सिंघमच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. 'क्राइम पेट्रोल' आणि 'सिंघम अगेन'मध्ये पोलिसांची भूमिका साकारणारी अभिनेत्री 'शबरीन'ला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.तिच्यावर अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा आरोप आहे.
क्राइम पेट्रोल' आणि 'सिंघम अगेन'मध्ये पोलिसाची भूमिका साकारणारी अभिनेत्री 'शबरीन' तिचा बॉयफ्रेंड ब्रिजेश सिंगवर खूप प्रेम करते. अभिनेत्रीच्या दाव्यानुसार, ब्रिजेशही तिच्यावर तितकेच प्रेम करतो. पण दोन्ही जाती आणि धर्म भिन्न आहेत.
राजपूत कुटुंबातील ब्रिजेश सिंह यांच्या कुटुंबीयांना मुस्लिम समाजातील शबरीन आपल्या घरी यावी असे वाटत नव्हते. दरम्यान, प्रेमापोटी शबरीन आणि ब्रिजेश या दोघांनीही घरच्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, ते मान्य झाले नाही. अशा स्थितीत शबरीनने ब्रिजेशच्या अडीच वर्षांच्या पुतण्याचे अपहरण केले.
अपहरणानंतर ब्रिजेशच्या कुटुंबीयांनी शबरीनविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबईतील वालीव पोलिसांनी अभिनेत्री शबरीनला अटक केली आहे. अपहरणात ब्रिजेशची भूमिका होती का, याचा पुरावाही पोलीस शोधत आहेत.