Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मग ‘सूर्यवंशी'ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर?

मग ‘सूर्यवंशी'ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर?
, बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (11:09 IST)
लॉकडाउनमुळे अद्यापही थिएटर्स बंद असून नुकतीच चित्रीकरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, चित्रपटगृहे कधी खुली होतील, हे अद्यापही अनिश्चित आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याने थिएटर लॉबी नाराज होत आहे. यामुळे ‘सूर्यवंशी' आणि ‘83' हे चित्रपट थिएटरवरच रिलीज करू अशी हमी दिल्यावर थिएटरवाले निश्चिंत झाले. पण आता मात्र हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याचे समजते. दिवाळी किंवा जास्तीत जास्त नाताळपर्यंत चित्रपटगृहे न उघडल्यास हे दोन्ही चित्रपट ओटीटीवर येण्याची शक्यता आहे. 
 
या दोन्ही सिनेमांबद्दल कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे ओटीटीवाल्यांनीही मोठी ऑफर या सिनेमांसमोर ठेवली आहे. रिलायन्स एंटरटेन्मेंटच्या गोटातून याची चाचपणी सुरू झाली आहे. पण येत्या काही दिवसात थिएटर्स उघडणार की नाही ते कळल्यानंतर पुढची पावले उचलली जाणार आहेत. दरम्यान, ‘सूर्यवंशी'मध्ये अक्षयकुमार मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांचे या सिनेमावर लक्ष आहे. दुसरीकडे 83 हा चित्रपट भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित असल्याने त्याबद्दलही उत्सुकता आहे. यात रणवीर सिंगची मुख्य भूमिका असून, दीपिका पदुकोण, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील यांच्याही भूमिका आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक! आणखीन 6 मराठी कलाकारांना झाली कोरोनाची लागण