सोहा आणि कुणाल खेमूला कन्यारत्न

अभिनेत्री सोहा अली खानने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात सोहाची डिलीव्हरी झाली. सोहाची आई अर्थात अभिनेत्री शर्मिला टागोर आणि पती म्हणजेच अभिनेता कुणाल खेमू सोहासोबत रुग्णालयात आहेत. सोहा आणि बाळ सुखरुप असल्याची माहिती कुणालने ट्विटरवरुन दिली आहे. 
 
नवरात्रीत सोहाला कन्यारत्न प्राप्त झाल्यानं पतौडी आणि खेमू कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. काहीच महिन्यांपूर्वी सोहाचा भाऊ सैफ अली खान आणि वहिनी करिना कपूरला मुलगा झाला होता. त्यामुळे छोट्या तैमूरला खेळण्यासाठी बहीण मिळाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख सर्वात जास्त पैसे कमविणार्‍या अभिनेत्रीत प्रियंका