Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल

webdunia
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (11:37 IST)
बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर हिनं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ते अशिक्षित, निरक्षर आणि दुर्लक्ष करणारे (Ignorant, Illiterate and Hateful) असल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिनं ही टीका केली.
 
आज सकाळी मात्र सोनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही स्टोरी दिसत नाहीये.
 
अभिनेत्री रिचा चड्डानेही सुधीर मुनगंटीवारांचा विधिमंडळातील व्हीडिओ ट्विट करत लिहिलंय, "असभ्य, अज्ञानी आणि तिरस्करणीय अशी टिप्पणी. इतर अनेक गोष्टींप्रमाणे आपल्या 'नेत्यांना' लैंगिक शिक्षणाची गरज आहे."
 
सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2021 अधिनियमातील सुधारणांना विरोध दर्शवताना LGBTQIA समुदायातील सदस्यांबाबत काही वक्तव्यं केली होती. त्यावर टीका करताना सोनमनं ही स्टोरी शेअर केली.
 
मविआ सरकारनं मंजूर केलेल्या सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम विधेयक 2021 मधील एका तरतुदीनुसार प्रत्येक विद्यापीठाला समान संधी मंडळ स्थापन करावं लागेल. या मंडळाच्या माध्यमातून दुर्बल, महिला, लैंगिक अल्पसंख्यांक (LGBTQA), विकलांग यांना समान संधी आणि सुरक्षा मिळेल.
 
मात्र याला विरोध करतान मुनगंटीवार म्हणाले होते. "समलैंगिकांना तुम्ही सदस्य नियुक्त करता, काही गांभीर्य आहे का? हे विधेयक आहे. अद्याप अनैसर्गिक संबंधांची व्याख्या नाही, आपण काय कायदे करत आहोत."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'दिलबर दिलबर' या गाण्यामुळे हिट झालेली नोरा फतेही कोरोना पॉझिटिव्ह