Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

माझ्या मुलाने भारतात काम करू नये- सोनू निगम

माझ्या मुलाने भारतात काम करू नये- सोनू निगम
, मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (15:28 IST)
माझ्या मुलाला मी गायक करणार नाही. किमान भारतात तरी त्याने काम करू नये अशी माझी इच्छा आहे, असं मत गायक सोनू निगमने व्यक्त केलं आहे. 
 
सोनू निगमचा नवा म्युझिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. या आगामी अल्बममधील 'ईश्वर का वो सच्चा बंदा' या हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. त्यावेळी त्याने हे वक्तव्य केलं आहे.
 
"खरं सांगायचं तर त्याने व्यवसायिक गायक होऊ नये अशी माझी इच्छा आहे. अन् व्हायचंच असेल तर त्याने भारतात काम करू नये असं वाटतं. तो भारतात राहात नाही तो सध्या दुबईमध्ये आहे. त्याने तिथंच करिअर करावं असं वाटतं. त्याला गाण्याची आवड आहे. तो देखील खूप छान गातो. पण त्याला गाण्यापेक्षा अधिक गेमिंग करायला आवडतं. मला वाटतं त्याने आपलं करिअर निवडलं आहे," असं सोनूने म्हटलं आहे.
 
यापूर्वी सोनूने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर देखील टीका केली होती. अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील, अशी भीती मला वाटतेय, असंही तो म्हणाल आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिशा पटनीची हॉट बिकिनीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली, टायगर श्रॉफच्या आईने ही प्रतिक्रिया दिली