Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

सुहाना खानचा साडी लुक व्हायरल

Actor Shahrukh Khan s daughter Suhana Khan
, सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (22:19 IST)
अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे बोल्ड आणि हॉट फोटो प्रेक्षकांच्या देखील चांगलेच पसंतीस पडत असल्याचे दिसून आले आहे.
 
आता पुन्हा एकदा सुहानाच्या नव्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांना वेड लावले आहे.सुहानाने इनस्टाग्राम तिचे साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. यात तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. सध्या तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीस पडत असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
 
इतकेच काय तर अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि अगस्त्य नंदा याची आई श्वेता बच्चन हिने देखील सुहानाच्या फोटोंवर ‘सुंदर मुलगी’ अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, सुहाना लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सुहानासोबत श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाही दिसणार आहेत. या चित्रपटातून सुहाना खानने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Independence Day 2023 :गुजरातमधील या सर्वोत्तम ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा करा