Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिबरला सनी लिओनने दिला खास सल्ला

बिबरला सनी लिओनने दिला खास सल्ला
इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबर एका म्युझिक कॉन्सर्टसाठी भारतात येत आहे. 10 मे रोजी नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे.
 
बिबरला सनी लिओनने डान्सविषयी एक खास सल्ला दिला आहे. सनीचा हा सल्ला देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिबर मी सनी लिओनी, भारतात तुझे स्वागत करते आणि सोबतच तुला एक सल्लाही द्यायचाय. तू स्टेजवर परफॉर्मन्स करशील तेव्हा मी सांगितलेली ही स्टेप नक्की कर, असे म्हणत सनीने ती स्टेप करण्याची मागणीही बिबरकडे केली आहे.
 
जस्टिन बिबरच्या 10 मेच्या शोसाठी ति‍कीट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या कार्यक्रमासाठी कमीत कमी तिकिट 5040 रूपये आहे, तर प्लॅटिनम तिकिट 15400 पर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे तिकीट ईएमआयवरही मिळत असल्याचंही बोललं जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा निकाल