सनी लिओनी थोडक्यात बचावली

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या खाजगी विमानाला होणारा अपघात थोडक्यात वाचला आहे. त्या अपघातातून सनी लिओनी थोडक्यात बचावली आहे. या अपघाताची माहिती सनीने आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. खराब हवामानामुळे विमान क्रॅश होणार होते पण वैमानिकाने आपले संतुलन न ढासळता विमानावर नियंत्रण मिळवले. हा अपघात लातूरमध्ये झाल्याचे समजते. आज सनी लिओनी एका का फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी लातूरला हजेरी लावली होती. माघारी येत असताना अपघात होताहोता राहिला.
 
सनीने आपल्या ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ कारमध्ये आहे. यामध्ये ती सांगते की आमचे विमान कोसळता कोसळता थोडक्यात बचावले. आम्ही सर्वजन सुखरुप आहोत. देवाच्या कृपेमुळे अपघात होता होता वाचला. विमानातील सर्वजण सुखरुप आहेत. कारमध्ये सनीचा पती डॅनियल वेबरसह अन्य काही लोक दिसत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख शुटिंग दरम्यान अपघात, शाहरुख थोडक्यात बचावला