तब्बल आठ वर्षांनंतर सुश्मिता सेनची फिल्मी वापसी

बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (14:03 IST)
तब्बल आठ वर्षांनंतर अभिनेत्री सुश्मिता सेन चंदेरी पडद्यावर पुनरागन करत असून 2010 मध्ये अक्षय खन्ना व अनिल कपूरसोबत 'नो प्रॉब्लेम' या चित्रपटात सुश्मिताने भूमिका साकारली होती. ती तेव्हापासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता आपल्या दमदार अभिनयासह सुश्मिता सेन पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुश्मिताने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे, की बर्‍याच चित्रपटांच्या स्क्रिप्ट तिने वाचल्या, पण योग्य कथेची प्रतीक्षा ती करत होती. शेवटी एका चित्रपटासाठी तिने होकार दिला आहे. तिचा आगामी चित्रपट हा क्राईमवर आधारित असेल. यात ती महिला पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ती या भूमिकेसाठी जीममध्ये प्रचंड मेहनत घेत आहे. तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ती चित्रपटाच्या तयारीसाठी जीममध्ये घाम गाळताना या फोटोंमध्ये दिसत आहे. अद्याप सुश्मिाताच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली नाही, पण सुश्मिताच्या कमबॅमकमुळे तिचे चाहते नक्कीच आनंदी होतील.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख शिक्षक म्हणजे एक समुद्र...