Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेता आदित्य सिंग राजपूतचा संशयास्पद मृत्यू,बाथरूम मध्ये आढळला मृतदेह

Aditya Singh Rajput
, मंगळवार, 23 मे 2023 (10:31 IST)
लोकप्रिय अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत याचे निधन झाले आहे. त्याचा मृत्यू अत्यंत गूढ पद्धतीने झाला आहे. सोमवार 22 मे 2023 रोजी तो त्याच्या घराच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. मित्र आणि इमारतीच्या चौकीदाराने त्याला रुग्णालयात नेले. जिथे अभिनेत्याला मृत घोषित करण्यात आले. वृत्तानुसार, अभिनेत्याचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाला असावा.
 
'स्प्लिट्सविला' आणि   'गंदी बात' व्यतिरिक्त इतर अनेक टीव्ही शोमध्ये दिसलेला अभिनेता आदित्य सिंग राजपूत याचे निधन झाले आहे. 22 मे रोजी दुपारी तो अंधेरी येथील त्याच्या घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. आदित्यच्या मित्राने त्याचा मृतदेह बाथरूममध्ये पाहिला. आदित्य सिंग राजपूत हा अंधेरी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर राहत होता. आदित्यसिंग राजपूतचा मृतदेह बाथरूममध्ये पाहिल्याबरोबर मित्राने लगेच खाली उतरून इमारतीच्या चौकीदारासोबत वरचा मजला गाठला.
 
दिल्लीत जन्मलेल्या, वयाच्या17  व्या वर्षी करिअरला सुरुवात केली
आदित्य सिंग राजपूतचा जन्म दिल्लीत झाला. मात्र, त्यांचे कुटुंब मूळचे उत्तराखंडचे आहे. वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला त्याच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय एक मोठी बहीण आहे. लग्नानंतर त्यांची बहीण अमेरिकेत शिफ्ट झाली.
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Salman Khan: सिनेमानंतर सलमान खानची बोल्ड स्टाइल आता या वेब सीरिजमध्ये ओटीटीवर दिसणार