Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 12 February 2025
webdunia

...म्हणून मला धमक्या मिळतात!

...म्हणून मला धमक्या मिळतात!
, शुक्रवार, 25 मे 2018 (11:03 IST)
कोणत्याही संवेदनशील मुद्यांवर मी व्यक्त होत असते. पण मला त्याची किंमत मोजावी लागते. कित्येकदा तर मला धमक्या मिळतात, लोकांचे शिव्याशाप ऐकून घ्यावे लागतात...हे म्हणणं आहे अभिनेत्री स्वरा भास्करचं. आगामी 'वीरे दी वेडिंग'या चित्रपटाच्या निमित्तानं तिनं तिचं म्हणणं मांडल. 'वीरे दी वेडिंग'चा ट्रेलर लाँच झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमातल्या मुख्य भूमिकांपैकी एक भूमिका निभावणार्‍या स्वरा भास्करची एक संवेदनशील अभिनेत्री अशी ओळख आहे. या संवेदनशीलतेची आणि बुद्धिजीवी असण्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते असं ती सांगते. ती म्हणते, की मी, प्रकाश राज, रिचा चड्डा यासारख्या आम्हा कलावंतांना त्यांच्या बुद्धिजीवी असण्याची मोठी किंमत मोजावी लागते. आजच्या सोशल मीडियाच्या खोट्या व्हर्च्युअल जगात राजकीय आणि सामाजिक मद्यांवर तुम्ही जर तुमची खरी मतं मांडली तर, तुम्ही इथे नाही टिकू शकत. गेली पाच वर्षे मी याचीच किंमत मोजतेय. सिनेमात  काम मिळत नाहीत असा त्याचा अर्थ नाही. पण कुठल्याही मुद्यांवर मी उघडपणे व्यक्त झाले तर मला धमक्या मिळतात, नको ते बोललं जातं. त्यातून आपल्याकडे एक मुलगी जर बोलत असेल, तर तिचं ऐकून घेण्याची तयारीच नसते. मी टूच्या चळवळीनंतर हॉलिवूमडध्ये बर्‍याच अभिनेत्रींनी खुलेपणानं अनेकांची नावं घेतली. आपल्याकडे कास्टिंग काऊचबद्दल प्रत्येक बॉलिवूडकर बोलतोय. पण, कास्टिंग काऊच अस्तित्वात आहे हे सांगण्याइतपतच हा मुद्दामांडला जातो. कोणी नावानिशी बोलत नाही. आपला समाज त्यासाठी खरंच तयार आहे का? आम्ही जेव्हा उनाव आणि कठुआला झालेल्या बलात्कारांच्या घटनांबद्दल बोललो, तेव्हा मी पब्लिसिटीसाठी ते करतेय म्हणून मला वाट्टेल ते बोललं गेलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोलो ट्रॅव्हलला जाताय...।।