Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भोला’चित्रपट मध्ये पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत तब्बू

webdunia
शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (08:26 IST)
‘दृश्यम 2’ला मिळालेल्या यशानंतर अजय देवगणचे चाहते त्याचा पुढील चित्रपट ‘भोला’च्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी दिसून येणार आहे. निर्मात्यांनी ‘भोला’मधील अजय देवगणचा फर्स्ट लुक यापूर्वीच जारी केला हाता. आता तब्बूच्या भूमिकेचे पोस्टरही समोर आले आहे.
 
‘भोला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणच करत आहे. हा तब्बूसोबतचा त्याचा 9 वा चित्रपट असणार आहे. निर्मात्यांनी तब्बूच्या भूमिकेचे पोस्टर जारी केले असून यात ती पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसून येत आहे. अजय  देवगणने तब्बूचा फर्स्ट लुक शेअर करत एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात तब्बू ‘आज रात या तो वो हमें ढूंढ लेगा या हम उसे, गोली तो खानी ही पडेगी’ हा डायलॉग म्हणत असल्याचे दिसून येते.
 
अजय देवगणकडून दिग्दर्शित हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित तमिळ ब्लॉकबस्टर ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. कैथीचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले होते. आता याच कहाणीला अजय देवगण हिंदी भाषिक प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी 3डीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहरुख खानने प्रमोशनसाठी ‘कपिल शर्मा शो’च्या मंचावर येण्यास दिला नकार