Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून टप्पू एक्झिट घेणार

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून टप्पू एक्झिट घेणार
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून लवकरच भव्य गांधी म्हणजे टप्पू एक्झिट घेणार आहे. मागच्या नऊ वर्षांपासून टप्पूची भूमिका साकारणा-या भव्यने  काही कारणांमुळे ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गडा कुटुंबातील टप्पू या मालिकेतील मुख्य पात्र आहे.  

मागच्या नऊ वर्षात टप्पूच्या खोडकरपणातून निर्माण झालेल्या वादांनी  प्रेक्षकांना भरभरुन हसवले. मालिका सुरु झाली तेव्हा शाळेत जाणारा टप्पू आता कॉलेज कुमार झाल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. भारतात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहून आपली संस्कृती जपतात तसेच या मालिकेत दाखवण्यात आले. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष भावली. निखळ विनोदातून सामाजिक संदेश हे या मालिकेचे आणखी एक वैशिष्टय आहे. त्यामुळे या मालिकेचा एक प्रेक्षकवर्ग आहे. 

फोटो: सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमावस्येच्या शुभेच्छा