सगळ्यांचा आवडता कार्यक्रम ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेची आतूरतेने वाट पाहत होते. मात्र अखेर या मालिकेचा नवा भाग कधी प्रदर्शित होणार हे सांगण्यात आलं आहे. मालिकेच्या मेकर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या नव्या भागाची तारीख जाहीर केली आहे.
येत्या २२ जुलै रोजी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका पुन्हा एकदा सुरु होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे असं दिसून येतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते.