अभिनेता अमित पुरोहितचे निधन

शुक्रवार, 12 जुलै 2019 (09:24 IST)
बॉलिवूड अभिनेता अमित पुरोहितचं निधन झाले आहे. अमित पुरोहितने २०१८ मध्ये अभिनेत्री अदितीराव हैदरीसोबत सुपटहिट 'संम्मोहन' या चित्रपटातून भूमिका साकारली होती. अमित पुरोहित, अदितीराव हैदरीसोबत असलेल्या नात्यामुळेही चर्चेत होता. अमित पुरोहित यांचे सहकलाकार सुधिर बाबु यांनी १० जुलै रोजी अमितच्या निधनाची माहिती दिली. अमितच्या निधनाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. 

अमितच्या मृत्यूची माहिती देत सुधीर बाबूने लिहिले, 'अमित पुरोहितच्या मृत्यूच्या बातमीने खूप दुखी आहे. त्याने 'सम्मोहनम' मध्ये अमित मल्होत्राची भूमिका साकारली होती. खूपच मनमिळाऊ मुलगा आणि नेहमी प्रत्येक शॉटसाठी 100% देत होते. आणखी एक चांगला अभिनेता आपल्याला खूप लवकर सोडून गेला. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.'

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख फोर्ब्स / अक्षय सर्वात जास्त कमाई करणार्‍या 100 सेलेब्रिटीमध्ये एकटा भारतीय, सलमान लिस्टच्या बाहेर