Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Apurva Agnihotri 50 वर्षीय अभिनेता बनला बाबा

webdunia
शनिवार, 3 डिसेंबर 2022 (16:24 IST)
आई आणि वडील होणं हा जगातील सर्वात मौल्यवान आनंद आहे. जगातील कोणत्याही सुखाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. आई किंवा वडील असण्याची भावना शब्दात वर्णन करता येत नाही. मातृत्वाचा आनंद फक्त अनुभवता येतो. अलीकडेच लोकप्रिय टीव्ही जोडपे अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सकलानी यांच्या घरातील लग्नाच्या 18 वर्षांनंतर गुंजले आहे. वयाच्या 50 व्या वर्षी वडील झाल्यानंतर अपूर्व अग्निहोत्रीला आनंदाची सीमाच राहिली नाही. अठरा वर्षांनंतर त्यांना हा आनंद मिळाला आहे.
 
Apurva Agnihotri आणि Shilpa Saklani या दोघांनी 2004 मध्ये लग्न केले आणि लग्नाच्या 18 वर्षानंतर ते आता एका सुंदर मुलीचे पालक आहेत. अपूर्व अग्निहोत्रीला वयाच्या 50 व्या वर्षी वडील झाल्याचा आनंद मिळाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून बाप झाल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला. 'जस्सी जैसी कोई नहीं' आणि 'अनुपमा' सारख्या टीव्ही शोशिवाय, अपूर्व अग्निहोत्रीने 'परदेस', 'प्यार कोई खेल नहीं' आणि 'कसूर' सारखे चित्रपट केले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित