बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी कल्पनाही केली नसेल की कॉमेडियन कपिल शर्मा त्यांना देखील वाट बघायला लावणार! कौन बनेगा करोडपती 13 च्या शूटिंगसाठी कपिल शर्मा 12:00 वाजता पोहोचणार होते पण कपिल जवळपास चार तास उशिरा पोहोचले. कपिल शर्मा सोनू सूदसोबत स्टेजवर पोहोचताच अमिताभ बच्चन यांनी त्याला खडसावलं !
यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला म्हटले की, आज आपण योग्य वेळी आला आहात, आम्हाला आपल्याला 12.00 वाजता भेटायचे होते आणि आपण ठीक 4:30 वाजता आला! हे ऐकून कपिल शर्मा आणि सोनू सूदही हसायला लागले!
मात्र, यानंतर कपिल शर्मा आणि सोनू सूद हे शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्या काही हिट डायलॉगवर एकत्र अभिनय करताना दिसले, कपिल शर्मा शत्रुघ्न सिन्हा यांच्या स्टाईलमध्ये बसंतीच अभिनय करतो की अमिताभ बच्चन जोरजोरात हसायला लागतात.कपिल शर्मा यांनी KBC 13 मध्ये केवळ अभिनय आणि वादनच नाही तर गाण्यानेही सर्वांची मने जिंकली आहेत.