Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 22 March 2025
webdunia

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक आज त्यांचा ५९ वा वाढदिवस साजरा करीत आहे

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक आज त्यांचा ५९ वा वाढदिवस साजरा करीत आहे
, गुरूवार, 20 मार्च 2025 (10:13 IST)
Famous Bollywood singer Alka Yagnik Birthday: आज प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक यांचा ५९ वा वाढदिवस आहे. अलका याज्ञिक यांचा जन्म २० मार्च १९६६ रोजी कोलकाता येथे झाला. अलकाची आई शुभा याज्ञिक शास्त्रीय संगीतकार होती आणि घरातील संगीतमय वातावरणामुळे अलका यांनाही संगीताची आवड निर्माण झाली. अलका यांनी वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. अलकाने आकाशवाणी कोलकातामध्ये गाणे सुरू केले.
ALSO READ: प्रार्थनांना फळ मिळाले, सुनीता विल्यम्सच्या पुनरागमनावर आर माधवनने व्यक्त केला आनंद
तसेच अलका यांचा चित्रपटांमध्ये गाण्याचा प्रवास ९० च्या दशकात सुरू झाला. अलकाला गायनाचा पहिला ब्रेक फक्त १४ वर्षांचा असताना मिळाला. बॉलिवूडमध्ये, गायिकेने 'पायल की झंकार' चित्रपटात तिचे पहिले गाणे 'थिरकट अंग लचक झुकी' गायले आणि त्यानंतर लवकरच अलकाला तिचे दुसरे गाणे मिळाले. त्यानंतर अलकाला पार्श्वगायिका म्हणून ओळख मिळाली. अलकाने आतापर्यंत २०,००० गाणी गायली आहे. तसेच अलकाचे वैवाहिक जीवन विशेष चांगले नव्हते. अलका यांनी १९८९ मध्ये नीरज कपूरशी लग्न केले होते परंतु गेल्या ३१ वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहे.
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संत एकनाथांची समाधी श्री क्षेत्र पैठण