सलमान खानचा ईदला प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम करत असल्याचा आजवरचा इतिहास आहे. मात्र, या ईदला प्रदर्शित झालेल्या ट्यूबलाईटला यश मिळालेले नाही. पहिल्या तीन दिवसात आजवरचा सर्वात कमी कमाईचा आकडा चित्रपटाने गाठत सलमानच्या ट्युबलाईटने आगळावेगळा विक्रम केला आहे.
23 जून रोजी चित्रपट प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 21.15, शनिवारी 21.17, तर रविवारी 22.45 कोटी इतकी कमाई केली आहे. आजवरचा सलमानच्या चित्रपटाचा नीचांक नोंदवत ट्यबलाईटने पहिल्या तीन दिवसात एकूण 64.77 कोटी इतकी कमाई केली आहे. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्शने ही आकडेवारी ट्विटरवर जाहिर केली आहे. सलमान खानच्या आजवर ईदला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची पहिल्या तीन दिवसांची कामगिरी पुढील प्रमाणे आहे.
बॉडीगार्ड – 2011 – 88.75 कोटी
एक था टायगर – 2012 – 100.16 कोटी
किक – 2014 – 83.83 कोटी
बजरंगी भाईजान – 2015 – 102.60 कोटी
सुल्तान – 2016 – 105.53 कोटी
ट्यबलाईट – 2017 64.77 कोटी.