Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

“तुम्हारी सुलु’ला एफडीएची नोटीस

tumhari sulu in vidya balan
, बुधवार, 6 डिसेंबर 2017 (12:20 IST)
बॉलीवुड अभिनेत्री विद्या बालनचा सुरेल आवाज आणि क्‍युट अशा कथानकामुळे “तुम्हारी सुलु’हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाईही करत आहे. मात्र, विद्यासाठी एक कडू बातमी आहे. विद्याला फूड अँड ड्रग असोसिएशनने (एफडीए) कफ सिरप प्रमोट केल्याबद्दल थेट नोटीसच बजाविली आहे.
 
टी सिरीजला देखील एफडीएने नोटीस पाठवली आहे. “तुम्हारी सुलु’ हा चित्रपट टी सिरीजची निर्मिती असून कफ सिरफमध्ये वापरण्यात आलेल्या गोष्टी आरोग्यास हानिकारक असल्याचे एफडीएच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
 
विद्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये या कफ सिरपचेही प्रमोशन करीत होती. याबद्दल एफडीएकडे वैद्यकिय कार्यकर्ता डॉ. सुभाष जगताप यांनी तक्रार दाखल केली होती. एखादा अधिकृत डॉक्‍टर पेशंटला जेव्हा औषध लिहून देतो त्यावेळी पेशंटचे वय, औषधाची मात्रा याचा उल्लेख करीत असतो. याचा भंग होत असल्याचे त्यांनी तक्रारीत नोंद केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बायकोला नावं ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे !