Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्क नाहीये? टीशर्टपासून तयार करा मास्क, रोनित रॉयचा व्हिडिओ तुफान व्हायल

मास्क नाहीये? टीशर्टपासून तयार करा मास्क, रोनित रॉयचा व्हिडिओ तुफान व्हायल
, मंगळवार, 21 एप्रिल 2020 (14:32 IST)
करोना विषाणूने जगात थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार हात धुणे तसेच बाहेर जाताना मास्क लावण्याचा सल्ला ‍दिला जात आहे. मात्र सध्या बाजारात मास्कचा तुटवडा जाणवत आहे अशात अभिनेता रोनित रॉयने घरच्या घरी मास्क करण्याची भन्नाट आयडिया शेअर केली आहे. त्याने चक्क टी-शर्टपासून मास्क तयार केला असून त्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 
 
लॉकडाउनमुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणार्‍या लोकांना मास्कची गरज भासते आणि मास्क विकत घेण्यापेक्षा घराच्या घरी टीशर्ट वापरुन मास्क तयार कसा करता येईल हे रोनितने शेअर केले आहे. 
 
‘मास्क नाहीये? काळजी करु नका. हे तयार करणं फार सोप्पं आहे’, अशी कॅप्शन देत रोनितने व्हिडीओ शेअर केला आहे. 
 
रोनित रॉय टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुहाना खानचा लॉकडाउनचा Video व्हायरल झाला, ती मित्राबरोबर मजा करताना दिसली ...