Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजश्रीने 'उंचाई'मधील दुसऱ्या व्यक्तीरेखेचे पोस्टर रिलीज केले

Uunchai
, बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (13:05 IST)
सुपरस्टार अनिल कपूरने त्यांचे प्रिय मित्र अनुपम खेर यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'उंचाई'तील त्यांच्या व्यक्तिरेखेचे पोस्टर बुधवारी सकाळी रिलीज केले. महावीर जैन फिल्म्स आणि बाउंडलेस मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री प्रॉडक्शन निर्मित, सूरज आर. बडजात्या दिग्दर्शित, 'उंचाई' 11 नोव्हेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
 
'उंचाई' चित्रपटाचा मध्यवर्ती विषय मैत्री हाच आहे. अमिताभच्या वाढदिवशी त्यांच्या मित्र धर्मेंद्रने अमिताभच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरच्या अनावरणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, आणि आता अनिल कपूरने त्यांच्या दीर्घकाळचा मित्र, अनुपम खेर यांचे 'उंचाई' मधील पोस्टर शेअर करून मैत्रीचा धागा पुढे नेला आहे. दोन भागात विभागलेल्या या पोस्टरमध्ये, अनुपम खेर त्यांच्या अनोख्या रूपात अष्टपैलुत्वाची झलक दाखवताना दिसत आहेत. दोन भागात विभागलेल्या पोस्टरमध्ये अनुपम खेर दोन पूर्णपणे भिन्न जगामध्ये दाखवले आहेत. एका बाजूला आपल्याला अनुपम खेर त्यांच्या पुस्तकांच्या दुकानानात दिसतात, तर दुसर्‍या बाजूला आपण त्यांना बर्फाच्छादित पर्वतांमध्ये पूर्णपणे वेगळ्या रुपात बघतो. उबदार कपड्याच्या अनेक थरांनी झाकलेल्या अनुपम खेर यांच्या डोळ्यात उत्कंठा आणि यश अशी दोन्हीची भावना दिसून येते.
 
चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या राजश्रीच्या आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा - 'उंचाई'चा अनुपम खेर एक महत्त्वाचा भाग आहेत. अनुपम खेर यांनी 38 वर्षांपूर्वी राजश्री प्रॉडक्शनसह त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आणि बॉलिवूडमधील प्रतिष्ठित अशा या प्रॉडक्शन हाऊससाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव पुरुष अभिनेता आहेत. अनुपम खेर यांनी यापूर्वी राजश्रीच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. दिग्दर्शक सूरज आर. बडजात्यासोबत त्यांचा हा चौथा चित्रपट आहे. 'उंचाई' हा या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जात याहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच 'उंचाई'मध्ये डॅनी डेन्ग्झोंपा आणि नफिसा अली सोधी यांच्याही अत्यंत महत्वपूर्ण अशा भूमिका आहेत. जीवन, वय आणि मैत्रीचा उत्सव असलेला 'उंचाई' चित्रपट 11.11.22 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Edited by: Rupali Barve

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तारक मेहता फेम दयाबेन यांना घशाचा कर्करोग?, चाहते अस्वस्थ