Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

Veera sathidar
, मंगळवार, 13 एप्रिल 2021 (15:36 IST)
2017 सालातील ‘कोर्ट’ या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या सिनेमातील वीरा साथीदार यांचं कोरोनाने निधन झालं आहे. ‘कोर्ट’ या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. वीरा साथीदार यांनी १९ मार्चला करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. १० दिवसानंतर ते करोना संक्रमित झाले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
कोर्ट सिनेमात पहिल्यांदा अभिनय
वीरा साथीदार यांनी कोर्ट सिनेमात पहिल्यांदा अभिनय केला. ‘कोर्ट’ सिनेमासाठी दोनशे लोकांचं ऑडीशन घेण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी वीरा साथीदार यांना विचारण्यात आलं आणि त्यांनी होकार दिला. यापूर्वी आंबेडकर चळवळीत वीरा साथीदार सामिल झाले होते. त्यामुळे चळवळ सोडून अभिनयात तुम्ही तग धरू शकणार नाही अशी टीका अनेकांनी त्यांच्यावर केली होती. मात्र हा सिनेमा लोकप्रिय ठरला. या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं. एवढचं नाही तर सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या श्रेणीत ‘कोर्ट’ सिनेमाची निवड झाली होती.शिवाय सिनेमातील वीरा साथीदार यांच्या अभिनयाच भरपूर कौतुक झालं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘वेल डन बेबी’चा अभिनेता पुष्कर जोगने आपल्या प्रियजनांसोबत साजरा केला ‘सुरक्षित’ गुढी पाडवा!