‘ट्रिपल एक्स – द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हॉलिवूड सुपरस्टार विन डिजेल लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका करणाऱ्या दीपिका पदुकोणने ही माहिती ट्विटवरुन दिली आहे. ट्विटमध्ये दीपिका म्हणते, ” विन, भारत तुझी श्वास रोखून वाट पाहात आहे. आपण लवकरच 12 आणि 13 जानेवारीला भेटूयात. आमच्याकडून तुला भरपूर प्रेम.”