Publish Date: Thu, 12 Jan 2017 (17:33 IST)
Updated Date: Thu, 12 Jan 2017 (17:38 IST)
‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या निमित्ताने हॉलिवूड अभिनेता विन डिझेल भारत दौऱ्यावर आला आहे. विनचे मुंबईत आगमन होताच पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेल्या अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने विनचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. त्यामुळे विनच्या भारत दौऱ्याची ही मराठमोळी सुरुवात झाली आहे. विनच्या भारत दौऱ्यासाठी दीपिकानेच खास आयोजन केले आहे. विन डिझेल भारतात दोन दिवस थांबणार आहे. या दौऱ्या तो चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे.