प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ हिंदी चित्रपट सृष्टीत एन्ट्री करणार

सोमवार, 15 एप्रिल 2019 (09:23 IST)
निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा येणारा नवीन चित्रपट स्टुडंट ऑफ द इअर 2 लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर
या चित्रपटाचे खास आकर्षण असणार आहे तो म्हणजे हॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विल स्मिथ होय. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये विल एन्ट्री करणार आहे. त्याच्या सोशल मिडीया पेज वरून एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विल स्मिथ स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटातील कलाकारांसोबत नाचतांना दिसून येतो आहे. यामुळे विल स्मिथही यामध्ये काम करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान करण जोहर यांना विल स्मिथबद्दल विचारण्यात आले यावर करण जोहर म्हणाला की विल स्मिथ फेसबुकवरील एक शो ‘बकेट लिस्ट’च्या शूटिंगसाठी भारतात आला आहे. मात्र स्मिथला बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स करण्याची फार इच्छा होती, चित्रपटात विल स्मिथ काम करणार आहे किंवा नाही यांवर मी काही सांगणार नाही. तुम्हाला हे माहित करुन घेण्यासाठी चित्रपट पहावा लागेल असे करण म्हणाला आहे. करण जोहर नेहमीच प्रेक्षकांना धक्का देतो त्यामुळे विल लवकरच चित्रपटात दिसेल असे चित्र आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख 'दिल दोस्ती दुनियादारी'ची ही खास जोडी विवाहबंधनात अडकली