Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

Akshaye Khanna in Dhurandhar
, मंगळवार, 9 डिसेंबर 2025 (17:54 IST)
वयाच्या पन्नासाव्या वर्षीही त्याच्या डोळ्यातली ती आग, त्याच्या आवाजातली ती धार, आणि त्याच्या चेहऱ्यावरची ती शांत क्रूरता…सगळं जसंच्या तसं आहे, पण यावेळेस आणखी तीव्र झालंय. धुरंधर हा फक्त सिनेमा नाही…हा अक्षय खन्नाचा मोठ्या पडद्यावरचा विजयी परतावा आहे. आता सर्वीकडे त्याचे कौतुक सुरु असताना एक प्रश्न पुन्हा उद्भवत आहे तो म्हणजे की अक्षय खन्नाकडे अफाट पैसा, नावाचून प्रसिद्धी, स्टारडम, लग्झरी लाइफस्टाइल सगळं आहे, तरीही त्यांनी आजपर्यंत लग्न का केलं नाही? याचं उत्तर त्यांनी स्वतः अनेक इंटरव्ह्यूमध्ये अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे.
 
लग्न न करण्यामागची मुख्य कारणं (अक्षय खन्नांच्या शब्दात) सांगायची झाली तर 
"मी लग्नाचा मटेरियलच नाही"
अक्षयचे म्हणे आहे की, "मी माझ्या आयुष्यावर 100% कंट्रोल ठेवू इच्छितो. लग्न केलं की मला माझं आयुष्य, वेळ, निर्णय सगळं कोणाशी तरी शेअर करावं लागेल. मी त्यासाठी तयार नाही."
 
एकटेपणा आवडतो
अक्षयला एकांत खूप आवडतो. "मी फक्त स्वतःचाच जबाबदार राहिलो तरी चालेल. पत्नी-मुलांचा विचार करायची मला गरज नाही." अक्षयने अगदी ठामपणे सांगितलंय की, "मला आयुष्यात कधीही मूल नको आहे. मुलं झाली की आयुष्य पूर्णपणे बदलतं, ती जबाबदारी मी घेऊ शकत नाही."
 
कमिटमेंट फोबिया
पूर्वी अक्षय रोमँटिक होता. 90 च्या दशकात करिश्मा कपूरसोबत त्याचं खूप सीरियस रिलेशनशिप होतं. दोघांची लग्नं ठरली होती, रणधीर कपूरांनी विनोद खन्नांकडे प्रपोजलही पाठवलं होतं. पण बबीता कपूरांनी करिश्माची करिअर पीकवर असताना लग्नाला नकार दिला आणि ते रिलेशनशिप तुटलं. 
त्या ब्रेकअपनंतर अक्षय पूर्णपणे कमिटमेंटपासून दूर गेला. 
 
आता तर ठरवलंचय की लग्नच करायचं नाही
आता वयाच्या 50 व्या वर्षीही अक्षयचे म्हणणे आहे की, "आता तर मला लग्नाची गरजच वाटत नाही. मी माझ्या आयुष्यात अगदी खुश आहे. लग्न करणं ही माझी प्राथमिकता कधीच नव्हती आणि यापुढेही नाही."
 
थोडक्यात, अक्षय खन्ना यांनी पैसा, प्रसिद्धी, फॅन फॉलोइंग असूनही स्वतःच्या सुखासाठी आणि स्वातंत्र्य आणि एकटेपणा निवडला. त्यांचं हे मत खूप स्पष्ट आणि ठाम आहे. त्यामुळेच आजही ते आनंदाने सिंगल आहेत आणि "छावा", "धुरंधर" सारख्या मोठ्या सिनेमांमध्ये आपल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना वेड लावत आहे!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गायक मोहित चौहान स्टेजवर गाताना अचानक खाली कोसळला, लोक मदतीला धावले