Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

VIDEO आदित्य रॉय कपूरला किस करण्याचा प्रयत्न, लोक म्हणाले हॅरेसमेंट

VIDEO आदित्य रॉय कपूरला किस करण्याचा प्रयत्न, लोक म्हणाले हॅरेसमेंट
, गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (13:05 IST)
अनेकदा आपल्या आवडत्या स्टार्सना समोर पाहून चाहत्यांचा उत्साह इतका शिगेला पोहोचतो की ते आपला संयम गमावतात. मात्र कलाकरांसाठी हे खूप अस्वस्थ करणारे अअसते. नुकतेच आदित्य रॉय कपूरसोबतही असेच काहीसे घडले आहे. आदित्य रॉय कपूरच्या आगामी शो 'द नाईट मॅनेजर'च्या स्क्रीनिंगदरम्यान एका महिला चाहत्याने अभिनेत्याला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. त्याने कशीतरी परिस्थिती हाताळली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला आदित्यसोबत सेल्फी घेण्यासाठी पोहोचल्याचे दिसून येते. तिने सेल्फी क्लिक केला, त्यानंतर ती आदित्य रॉय कपूरच्या गालावर जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करते. आदित्य रॉय कपूर त्यांना तसे करण्यास नकार देतात. आदित्य कसा तरी परिस्थिती हाताळतो आणि महिलेला मागे ढकलतो, त्यानंतर ती स्त्री पुन्हा त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करते. यानंतर अभिनेता स्वतःच महिलेपासून दूर होताना दिसत आहे. निघण्यापूर्वी ती महिला अभिनेत्याच्या हातांचे चुंबन घेते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

यूजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक महिलेवर शोषणाचा आरोप करत आहेत. वर्कफ्रंटवर बोलायचे तर आदित्य रॉय कपूर 'द नाईट मॅनेजर' द्वारे डिजिटल पदार्पण करत आहे. या शोमध्ये तो अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शोमध्ये शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, सास्वत चॅटर्जी आणि रवी बहल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. संदीप मोदी दिग्दर्शित द नाईट मॅनेजर 17 फेब्रुवारीपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेवटच्या भेटीत मधुबाला दिलीप कुमारना म्हणाल्या...