अभिनेत्री दीपिका पदुकोणचा सुपरहॉट आणि जबररदस्त अॅक्शन अवतार असलेला 'XXX: The Return of Xander Cage' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये दीपिकाला जास्त झळकली नव्हती. मात्र या ट्रेलरमध्ये दीपिकाचा सुपरअॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. दीपिकाने बिग बॉसच्या सेटवर सलमान खानसोबत हा ट्रेलर रिलीज केला आहे. दीपिकाचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात विन डीजेल 'Xander Cage' ची भूमिका निभावताना दिसणार आहे तर दीपिका 'Serena'च्या भूमिकेत दिसणार आहे.