Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

यामी गौतम लवकरच आई होणार

Yami Gautam Pregnancy News
, शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (10:09 IST)
फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीतील अभिनेत्री यामी गौतमच्या घरात लवकरच हशा पिकेल! बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम तिचा बेबी बंप लपवताना दिसली होती, ती प्रेग्नंट आहे.बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम धर आणि चित्रपट निर्माता आदित्य धर लवकरच आई-वडील होणार आहेत. ते त्यांच्या कुटुंबाचा विस्तार करण्यास तयार आहेत.यामी गौतम लवकरच आई होणार आहे. जेव्हापासून यामीला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल समजले तेव्हापासून ती खूप आनंदात आहे. त्यांच्या मुलाचा जन्म मे महिन्यात होऊ शकतो, असे बोलले जात आहे. नुकतीच यामी गौतम पती आदित्यसोबत दिसली होती, तेव्हा ती तिचा बेबी बंप लपवतानाही दिसली होती. तिने स्कार्फने पोट लपवले होते. 
त्यांच्या मैत्रीची सुरुवात 'उरी' च्या प्रमोशन दरम्यान झाली आणि त्यांनी कोविड नंतर लग्न करण्याची योजना आखली. 2021 मध्ये, त्यांनी हिमाचल प्रदेशातील यामीच्या घरी लग्न केले, फक्त तिचे कुटुंब उपस्थित होते.

Edited By- Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या मंदिरात भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत, कारण