यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दिल्लीतील रहिवासी असलेल्या एका तरुणाने आरोप केला आहे की एल्विशने आपल्याला ऑनलाइन वाद सोडवण्यासाठी बोलावले आणि मारहाण केली.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तरुणाने ने सांगितले की, त्याचे काम यूट्यूबवर कंटेंट तयार करणे आहे. एल्विश यादवही या कामाशी जोडले गेले आहेत. त्याचा एल्विशसोबत सोशल मीडियावर वाद सुरू होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी तो त्याच्या मित्राच्या दुकानात आला होता. जिथे एल्विश यादव आपल्या 8-10 समर्थकांसह पोहोचले. त्याच्यासोबत असलेले लोक दारूच्या नशेत होते आणि त्यांनी त्याला मारहाण केली.
सायंकाळी उशिरा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रात्री साडेआठ वाजता सेक्टर-53 पोलीस ठाण्याला घटनेची माहिती मिळाली. सेक्टर-53 पोलिस ठाण्यात एल्विश यादव आणि त्याच्या अज्ञात मित्रांविरुद्ध मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की एल्विश यादव आणि त्यांचे समर्थक तरुणाला मारहाण करत आहेत आणि जीवे मारण्याची धमकीही देत आहेत. तर दुसरीकडे पीडित तरुण एल्विश यादवला भाऊ म्हणून संबोधत आहे. पोलिसांनी सांगितले की, एल्विश यादव आणि त्याच्या अज्ञात मित्रांविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हायरल व्हिडिओचा तपास सुरू आहे.