rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वायआरएफ कडून २५ जुलै रोजी 'वॉर २' ट्रेलर लॉन्च – ऋतिक रोशन आणि एनटीआर चा २५ वर्षांचा चित्रपट प्रवास साजरा होणार!

War 2
, मंगळवार, 22 जुलै 2025 (12:21 IST)
‘वॉर २’ मध्ये २५ या अंकाला विशेष महत्त्व! यशराज फिल्म्सच्या (वायआरएफ ) स्पाय यूनिव्हर्समधील सर्वात बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन थ्रिलर ‘वॉर २’ मध्ये ऋतिक रोशन आणि एनटीआर यांची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे आदित्य चोप्रा यांचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
 
विशेष म्हणजे, २०२५ मध्ये ऋतिक रोशन आणि एनटीआर दोघांचेही चित्रपटसृष्टीतील २५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि वायआरएफ ही ऐतिहासिक संधी साधत २५ जुलै रोजी 'वॉर २' चा ट्रेलर रिलीज करणार आहे.
 
वायआरएफ ने आज त्यांच्या सोशल मीडियावर ट्रेलर लॉन्चबाबत अधिकृत घोषणा करत म्हटलं: "२०२५ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन आयकॉन्स त्यांचा वैभवशाली प्रवासाचे २५ वर्षे पूर्ण करत आहेत. या एकदाच येणाऱ्या संधीचा सन्मान करण्यासाठी, वायआरएफ २५ जुलै रोजी ‘वॉर २’ ट्रेलर लॉन्च करणार आहे!! टाइटन्स च्या या महाकाव्य संघर्षासाठी तयार व्हा!! आपले कॅलेंडर नक्की मार्क करा."
 
‘वॉर २’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कियारा अडवाणी प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सैयारा' चार दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील