Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षयच्या‘टॉयलेट’मध्ये भूमी

अक्षयच्या‘टॉयलेट’मध्ये भूमी
नुकताच अक्षयकुमारचा ‘रूस्तुम’ रिलीज झाला असून त्याच्या या चित्रपटाची चर्चा जोरात रंगली असतानाच त्याच्या आगामी ‘टॉयलेट’ या चित्रपटाचीही चर्चा सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या अभिनेत्रीचा शोध सुरू होता पण आता हा शोध संपला असून अक्षयकुमारची ‘टॉयलेट’मध्ये भूमी पेडणेकर ही हिरोईन असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे करणार आहे. ‘दम लगाके’मधील भूमीच्या कामाचे खूप कौतुक केले. त्यानंतर ती कोणत्या चित्रपटात कुणासोबत दिसेल याची चर्चा रंगली होती. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑङ्खर्स असूनही तिने त्या स्वीकारल्या नाहीत. अखेर तिच्याकडे हा अक्षयकुमारचा चित्रपट आला.

या चित्रपटाला भूमीने होकार दिला. तिला तिच्या दुसर्‍याच चित्रपटात अक्षयकुमारसारख्या कलाकारासोबत काम करायला मिळत आहे. 
 
टॉयलेट हा एक लव्हस्टोरी असणार आहे. सोबतच यात कॉमेडीही असणार आहे आणि हा सिनेमा नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावर प्रेरित असणार आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 86 कोटी एवढे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमानने केले माझ्या करिअरचे वाटोळे