Publish Date: Mon, 27 Jul 2015 (14:46 IST)
Updated Date: Mon, 27 Jul 2015 (14:48 IST)
अभिनेत्री परिणिती चोप्राला एका वेगळ्या अनुभवाला सामोरे जावे लागले. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसाठी आयोजित ‘मसान’च्या खास शोला ती हजर होती. चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रसंगाच्यावेळी परिणितीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती थिएटरमध्ये ढसाढसा रडली.
‘हा एक काळजाला हात घालणारा हृदयस्पर्शी चित्रपट आहे. चित्रपट पाहाताना मी खूप रडले. रिचाने केलेला अभिनय अप्रतिम आहे. विकीने तर मन हेलावून टाकले. या चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन. हा एक हिट चित्रपट आहे’, असे परिणिती म्हणाली.
या चित्रपटात रिचा चढ्ढा, विकी कौशल, संजय मिश्र आणि श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहे. ‘मसान’ या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला होता. सलग तीन दिवस चित्रपटाचे खास शो बॉलिवूड कलाकारांसाठी आयोजित करण्यात आले होते. राजकुमार हिराणी, कबीर खान, शबाना आझमी, दिया मिर्झा या कलाकारांनी हा चित्रपट पाहिला आणि खूप कौतुक केले. या कौतुकात आता परिणितीही सहभागी झाली आहे.