Publish Date: Mon, 27 Jul 2015 (13:14 IST)
Updated Date: Mon, 27 Jul 2015 (13:19 IST)
दीपिका पादुकोणला अमिताभ बच्चन फार पसंत करतात. एकदा त्यांनी असे ही म्हटले होते की जर ते तरुण असते तर त्यांनी दीपिकाचा हीरो बनणे पसंत केले असते. दीपिकाला ही बाब चांगल्या प्रकारे माहीत आहे.
नुकतेच दीपिकाने 'पीकू'ला मिळालेल्या यशाची पार्टी ठेवली होती. घाई गडबडीत ती पीकूचे को-स्टार अमिताभ बच्चन यांना निमंत्रण देण्याची विसरली. अमिताभ यांना वाईट वाटले असेल, पण ते म्हणाले कदाचित मी त्या पार्टीत फिट नसेन म्हणून माला आमंत्रण आले नाही. दीपिकाने याला आपण कधीच न विसरणारी चूक आहे, असे म्हटले.
इकडे काही लोकांचे म्हणणे आहे की दीपिका आणि अमिताभ यांच्या मधील दुरावा निर्माण झाला आहे. या अफवेला तेव्हा अधिक बळ मिळाला जेव्हा दीपिकाने नुकतेच विजय कृष्ण आचार्य यांचे चित्रपट सोडले. दीपिकाने या चित्रपटासाठी आधी होकार दिला होता. पण नंतर चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा समावेश करण्यात आला आणि दीपिकाने चित्रपटातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता असे म्हटले जात आहे अमिताभाशी दीपिकाचा मतभेद झाल्याने ती त्यांच्यासोबत चित्रपट करण्याच इच्छुक दिसत नाही आहे.
का सोडले दीपिकाने हे चित्रपट ... पुढील पानावर
दीपिका कँपच्या लोकांनी या बातमचीचे खंडन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की अमिताभ यांचे दीपिका फार आदर करते आणि पार्टीत न बोलावण्याचे तिला फारच दुःख आहे. आता सोबत चित्रपट न करण्याचा प्रश्न तर डेट्स इश्यूमुळे तिने चित्रपट सोडले न की बिग बी यांच्यामुळे.