Publish Date: Mon, 31 Aug 2015 (09:49 IST)
Updated Date: Mon, 31 Aug 2015 (09:53 IST)
सलमान खान अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने मोठ्या पडद्यावर किसिंग सीन कायम टाळले आहेत. मात्र, पडद्यावर किसिंग सीन न करण्याचा हा त्याचा नियम त्याच्यापुरताच मर्यादित नाही. त्याने ‘हिरो’मध्येही हा नियम लागू केला आहे.
सलमान खानची निर्मिती असलेला ‘हिरो’ हा सिनेमा येत्या 11 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सलमान खानने या सिनेमाच्या एडिटिंगदरम्यान काही सूचना दिल्या आहेत. आथिया आणि सूरजचा किसिंग सीन असलेला भाग सलमान खानने हटवण्यास सांगितले. सिनेमाशी संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज-आथियाचा हा सीन अगदीच काही बोल्ड वगैरे नव्हता. हिंदी सिनेमांमध्ये रोमँटिक सीन्स असतात, तसाच होता. मात्र, तरीही सलमान खानने तो सीन हटवायला सांगितला.