Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ए. आर. रेहमान यांच्याविरोधात फतवा

a r rahman
इस्लाम धर्मातील प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या जीवनावर इराणी निर्माते मजीद माजिदी ‘महम्मद-मेसेंजर ऑफ गॉड’ नावाचा चित्रपट काढत आहेत. या चित्रपटाला संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत असल्याने त्यांच्याविरोधात रझा अकादमीने फतवा काढला आहे.
 
इस्लाममध्ये प्रेषित महम्मद यांचे चित्र रेखाटणे किंवा त्यांची व्यक्तिरेखा साकारणे निषिद्ध मानले जाते. सार्‍या इस्लाम धर्मियांकडून याचे पालन केले जाते. अन्य धर्मातील व्यक्तींनी देखील असे करू नये म्हणून बजावण्यात येते. परंतु, ‘महम्मद- मेसेंजर ऑफ गॉड’ चित्रपटात या नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा मुस्लीम संघटनांकडून केला जात आहे. माजिदी आणि 
 
रेहमान यांचा हा चित्रपट काढण्याचा निर्णयच इस्लामविरोधी असल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध फतवा काढण्यात आला आहे. 
 
हाजी अली मशिदीचे इमाम मुफ्ती मेहमूद अख्तर यांच्याकडून हा फतवा जारी करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi