Publish Date: Tue, 08 Sep 2015 (10:18 IST)
Updated Date: Tue, 08 Sep 2015 (10:20 IST)
पुरस्कार आणि घसघशीत कमाईचं यश कंगनाच्या डोक्यात गेल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे.
कंगनानं दिग्दर्शकांच्या कामात ढवळाढवळ करायला सुरुवात केली असून सेटवर आपलंच म्हणणं ऐकलं जावं, असा तिचा हट्ट असतो. विशाल भारद्वाजसारख्या प्रथितयश दिग्दर्शकालाही तिनं शिकवण्यास कमी केलं नाही.
तिच नखर्यांना वैतागून त्यांनं आगामी सिनेमा रंगूनमधून कंगनाला डच्चू द्याची तयारी केल्याची बातमी आहे. क्वीनच्या यशानंतर विशालनं तिला रंगून सिनेमाची ऑफर दिली. या सिनेमात काम करण्यासाठी कंगनानं सलमान खानचा सुलताना हा सिनेमाही नाकारला.
या सिनेमासाठी कंगना जीवतोड मेहनत करत असल्याचंही कळलं होतं. मात्र आता त्याच सिनेमातून बाहेर पडण्याची वेळ तिच्यावर येण्याची शक्यता आहे. कंगनाला म्हणे या सिनेमाचं दिग्दर्शक व्हायचं होतं. सगळ्यांनी कंगनाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आपल्या हट्टावर ठाम आहे. त्यामुळे विशालनं दुसरी अभिनेत्री घेण्याची तयारी सुरू केली.