Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करीना डिसेंबरमध्ये होणार आई; सैफने केली घोषणा

करीना डिसेंबरमध्ये होणार आई; सैफने केली घोषणा
प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर येत्या डिसेंबरमध्ये आई होणार अशी घोषणा सैफ अली खानने केली आहे.
 
मी आणि माझी पत्नी घोषणा करतो की येत्या डिसेंबरमध्ये आमच्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे. आम्ही आपल्या हितचिंतकांच्या शुभेच्छांचासाठी आभारी आहोत. याचबरोबर आम्ही मीडियाचेही आभार मानतो ज्याने समजूतदारपणा दाखवून संयमाचा परिचय दिला.
अलीकडेच जेव्हा करीना आणि सैफ लंडनहून आले होते तेव्हा करीना प्रेग्नेंट असल्याचे वृत्त पसरत होते पण तेव्हा मात्र दोघानेही या बातमीची पृष्टी केली नव्हती. पण एका इव्हेंटमध्ये करीना कपूरने बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करत होती. 
 
सैफला पहिल्या पत्नी अर्थात अमृताहून कन्या सारा आणि मुलगा इब्राहिम आहे. सैफने करीनाशी ऑक्टोबर 2012 साली दुसरे लग्न केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नर्गिसला पुरूष नको, कुत्रं हवंय