Publish Date: Wed, 07 Oct 2015 (11:41 IST)
Updated Date: Wed, 07 Oct 2015 (12:02 IST)
सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर करिना कपूरने ‘चुंबन बंद’ची अट बॉलिवूडमध्ये घातली असल्याचा प्रत्यय आगामी ‘की अँड का’ या चित्रपटात आला आहे. अर्जुनसोबत करिना या चित्रपटात काम करीत असून या चित्रपटातही प्रणयाची दृश्ये आणि चुंबन देण्यास करिनाने नकार दिल्याचे समजते.
आर. बल्की यांच्या आगामी ‘की अँड का’ चित्रपटात करिना आणि अर्जुन विवाहित जोडपे असल्याचे दाखवायचे आहे. यासाठी दोघांत काही रोमान्सचे सीन्स ही कथेची गरज आहे. पण करिना आपल्या मतांवर ठाम राहिल्यामुळे चित्रपटातील प्रणयाचे सीन्स रद्द करावे लागले आहेत. या चित्रपटात करिना स्वतंत्र विचारांची आणि नोकरी करणारी स्त्री दाखवण्यात आली आहे. अर्जुन गृहस्थ नवर्याची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक आर. बाल्की हा चित्रपट चांगला बनावा यासाठी खूप मेहनत घेत आहेत. आठवडाभर करिना आणि अर्जुन बाल्कींच्यासोबत रिहर्सल करीत आहेत. ‘का अँड की’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असून यात अमिताभ आणि जया बच्चनही झळकणार आहेत.