Publish Date: Fri, 28 Aug 2015 (10:14 IST)
Updated Date: Fri, 28 Aug 2015 (10:17 IST)
रॅपर यो यो हनी सिंगच्या ‘बेपत्ता’ होण्याबाबत अनेक महिन्यांपासून कयास लावले जात आहेत. पण तो कुठे आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र हनी सिंगला एका व्यसनमुक्ती केंद्रात भेटलो होतो, असा खुलासा पंजाबी गायक जसबीर जस्सीने केल्याचं काही वृत्तात म्हटलं आहे.
हनी सिंग मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून जणू गायबच झाला आहे. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या हनी सिंगवर चंदीगडच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू आहेत. तर काहींचं म्हणणं आहे की हनी सिंग कोणत्यातरी आजाराने ग्रस्त आहे. पंजाबी सिंगर जसबीर म्हणाला की, हनीबाबत समजल्यानंतर मला फारच दु:ख झालं आहे. त्याला प्रचंड त्रास होत आहे. फक्त स्टेजवरच नाही तर खासगी आयुष्यातही तो उत्साही होता, पण तो त्यावेळी निराश होता. हनी सिंगला काय झालं याबाबत विचारला असता जसबीर जस्सी म्हणाला की, तेच स्टेरॉईडस् वगैरे..तो फारच आजारी होता. मी त्याला रिहॅबमध्ये भेटलो तेव्हा फारच वाईट वाटलं. त्याचा मॅनेजर म्हणाला की, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.