Publish Date: Fri, 18 Sep 2015 (11:24 IST)
Updated Date: Fri, 18 Sep 2015 (11:28 IST)
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटानंतर आता पुन्हा एक जोडपं घटस्फोट घेतंय.
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी आपल्या पाच वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. दोघांनी आपआपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिलीय. त्यांच्यात उडणार्या खटक्यांबद्दल विविध चर्चा होत होती. त्यांना एक चार वर्षीय मुलगा आहे, ‘हारून’ हे त्याचं नाव. कोंकणा आणि रणवीरनं आपल्या ट्विटरवर लिहिलंय.
कोंकणा म्हणते, ‘रणवीर आणि मी एकमेकांच्या सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. मात्र आम्ही मित्र आणि आमच्या मुलाचे पालक राहूच. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.’ रणवीरनंही आपल्या ट्विटरवर हेच शब्द मांडले आहेत.
कोंकणा आणि रणवीरनं 2007मध्ये डेटिंग सुरू केलं. दोघांनी एका खासगी समारंभात 2010मध्ये लग्न केलं होतं. दोघांनी एकत्र ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘मिक्स्ड डबल्स’, ‘आजा नचले’ आणि ‘गौर हरि दास्तान’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.