Publish Date: Fri, 18 Sep 2015 (11:49 IST)
Updated Date: Fri, 18 Sep 2015 (11:55 IST)
रणवीर-दीपिकाच्या भलताच प्रेमात पडलाय.. असं आम्ही नाही तर त्यानेच सांगितलंय.. तेही जाहीररीत्या..रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा अभिनित बाजीराव-मस्तानी हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्तानं या चित्रपटातील ‘गजानन’ हे गाणं मंगळवारी प्रदर्शित करण्यात आलं. या लाँचिंगसाठी एक खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रणवीर आणि दीपिका दोघेही उपस्थित राहणार होते. पण, त्यांना या कार्यक्रमाला मात्र उशीर झाला. यासाठी, रणवीरनं सगळ्या उपस्थितांची माफीही मागितली.
यावेळी, आपल्या नेहमीच्याच गमतीदार शैलीत रणबीरनं आपल्या मनातलं बोलून टाकलंच.. ‘मला सांगितलं गेलं होतं की सकाळी 9 वाजल्यापासून लोक आपली वाट पाहतायत.. पण, दीपिका खूप सुंदर दिसते, मी तिची आयुष्यभर वाट पाहू शकतो’ असं म्हणत रणवीरनं एकाच बाणात दोन पक्षी मारले. संजय लीला भन्साळीनिर्मित ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा येत्या 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.