‘मस्ती’ चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमाची सेन्सॉर कॉपी प्रदर्शनापूर्वी लीक झाली आहे. रिलीजच्या 15 ते 20 दिवस आधीच हा प्रकार उघडकीस आला आहे.
ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे उडता पंजाब आणि सुल्तान या चित्रपटांची सेन्सॉर कॉपी लीक झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आला आहे.
अनेकांनी सिनेमा डाऊनलोड केला आहे. तर अनेक बॉलीवूड कलाकरांनी यावर संताप व्यक्त केला आहे. आधीच ऑनलाईन लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर मोठा परिणाम होईल असं मानलं जात आहे.
ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटात मस्ती सिनेमातील त्रिकूट विवेक ऑबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांची प्रमुख भूमिका आहे. तर उर्वशी रौतेला, श्रद्धा दास, पूजा चोप्राही यात दिसणार आहे. मस्ती आणि ग्रँड मस्ती नंतर या सीरिजमधील ग्रेट ग्रँड मस्ती हा तिसरा चित्रपट आहे.