suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्युनिअर माधवनला बॉक्सिंगचे वेड

r. madhvan
आर. माधवन सध्या आपल्या कुटुं‍बीयांसोबत मलेशियामध्ये सुटीचा आनंद लुटतो आहे. तसेच तो एका उत्तम बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या शोधात थायलंडलादेखील गेला होता. माधवनने 'साला खड़स' चित्रपटादरम्यान बॉक्सिंगचे प्राथमिक शिक्षण घेतले असले, तरी आपल्या मुलाने बॉक्सिंगचे व्यावसायिक पद्धतीचे शिक्षण घ्यावे, अशी त्याची इच्छा आहे. 
 
एनसीसी कॅडेट असलेल्या माधवनने सैनिकी प्रशिक्षणदेखील घेतले आहे. त्यामुळेच आपल्या मुलानेदेखील खेळातील उच्चतम प्रशिक्षण घ्यावे, असा त्याचा मानस आहे. बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी सांगत, माझ्या मुलाने स्वत:हून बॉक्सिंगसारखा कठीण खेळ शिकण्याची इच्छा व्यक्त केल्याचे तो म्हणाला. मुलाला बॉक्सरच्या अवतारात पाहून आपल्याला खूप समाधान मिळणार असल्याचेदेखील त्याने सांगितले.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋतिक- कंगना यांच्या वादावर काय बोलले अमिताभ?