Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'डॉन'ची जंगली बिल्ली कतरिना

kareena
फरहान अख्तरने काढलेल्या दोन्ही 'डॉन' सिनेमात अभिनेत्री प्रियंका चोप्रा डॉनची जंगली बिल्ली झाली होती आणि आता तिसर्‍या सिनेमातही तिलाच घेण्याची फरहानची इच्छा होती. मा‍त्र, प्रियंका तिची आंतरराष्ट्रीय मालिका आणि नव्या गाण्याच्या अल्बममध्ये व्यग्र आहे. त्यामुळे तिला काही यात काम करणे जमणार नाही. म्हणून फरहानने तिच्या जागी कतरिनाला घ्यायचे ठरवले आहे. याही सिनेमात शाहरुख मुख्य भूमिकेत असल्यामुळे कतरिना शाहरुखची जोडी परत एकदा दिसणार आहे. फरहानला तीन शेड्यूलमध्ये शूटिंग संपवून सिनेमा वेळेत पूर्ण करायचा आहे. कतरिनाला ते जमण्यासारखे आहे आणि मुख्य म्हणजे 'धूम थ्री', 'एक था टायगर' या सिनेमांत तिने भरपूर स्टंट्स व डान्सचे कौशल्य दाखवले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi