Publish Date: Sat, 11 Jun 2016 (12:10 IST)
Updated Date: Sat, 11 Jun 2016 (12:11 IST)
बाहुबली चित्रपटाची नायिका तमन्ना भाटियाने सर्वाना चकित करुन सोडले आहे. मेकअप आर्टिस्टसोबत प्रेमप्रकरण असलचा तिने खुलासा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अजय देवगण आणि अक्षयकुमारसारख्या कलाकारांसोबत काम केलेल्या तमन्नाने मेकअप आर्टिस्टसोबत प्रेम असल्याचा खुलासा केला. मुंबईतील इव्हेन्टच्यावेळी बोलताना ही गोष्ट सांगितली.
मेकअप आर्टिस्ट बिली माणिक याच्यावर तिचे प्रेम आहे. दोघांत इतकी चांगली मैत्री आहे की त्याचे रुपांतर प्रेमात झाले. एका अँकॅडमी लाँचच्यावेळी ती बोलत होती. मेकअप आर्टिस्ट बिली माणिक आणि तिने ही गोष्ट सांगितली. त्यांच्या दिवसाची सुरूवात मेकअप करण्यापासून होते आणि मेकअप उतरल्यानंतर ते एकत्र राहतात.