Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तीन मुलींचे वडील बनणार शाहरुख

तीन मुलींचे वडील बनणार शाहरुख
बॉक्सऑफिसवर 'दिलवाले'ने काही कमाल केली नाही त्यामुळे रोहित शेट्टी आणि शाहरुख खान यांच्यात मनमुटाव झाल्याची बातमी येत होती. ते दोघं आता कधीही बरोबर काम करणे शक्य नाही असा अंदाज बांधला जात होता पण आता ते दोघेही जुन्या आठवणीं विसरून तीसर्‍या चित्रपटाची तयारी करत आहे. चेन्नई एक्सप्रेस आणि दिलवाले नंतर ते तिसर्‍या सिनेमासाठी बरोबर काम करणार आहे.
 
सूत्रांप्रमाणे शाहरुख-रोहित तमिळ सिनेमा 'थेरी' चा हिंदी रीमेक तयार करणार आहे. तमिळामध्ये सुपरस्टार विजय याने मुख्य भूमिका साकारली होती. आता हिंदी रीमेकमध्ये हा रोल शाहरुख करणार आहे.
 
ही एक अश्या वडिलांची कहाणी आहे जे आपल्या तीन मुलींच्या सुरक्षेसाठी तीन भूमिका साकारतो. शाहरुखवर हा रोल‍ फिट बसेल असे रोहितचे म्हणणे आहे. हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज होईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

#whatsapp cornerचौसष्ट दात