तेरे बिन लादेन हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच पाक कोटीचा व्यवसाय करत संजय दत्त व बिपाशाचे काम असलेल्या ‘लम्हा’ व विक्रमादित्य मोटवानीच्या ‘उडान’ या दोन चित्रपटांना चांगलीच टक्कर दिली आहे.
अभिषेक शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, बोनी कपूर यांच्या बीएसके नेटवर्ककडे याच्या वितरणाचे अधिकार आहेत. चित्रपटाला वाढती मागणी पहाता बोनी कपूर यांनी या चित्रपटाच्या आणखी 40 ते 50 प्रिंट काढण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटन, अरब अमीरात, ऑस्ट्रेलियात तेरे बिन लादेनने चांगला व्यवसाय केला असून, आता चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे.